बीड - खेर्डा येथे शेतकरी संघटना कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
बीड, 12 एप्रिल (हिं.स.)। माजलगाव तालुक्यातील खेर्डा खुर्द येथे दि.१६ ते १८ एप्रिल रोजी शेतकरी संघटना कार्यकर्ता प्रशिक्षणाचे शिबिर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील व कालिदास आपेट यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय या शिबिर
बीड - खेर्डा येथे शेतकरी संघटना कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन


बीड, 12 एप्रिल (हिं.स.)। माजलगाव तालुक्यातील खेर्डा खुर्द येथे दि.१६ ते १८ एप्रिल रोजी शेतकरी संघटना कार्यकर्ता प्रशिक्षणाचे शिबिर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील व कालिदास आपेट यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे.

याशिवाय या शिबिराचे उद्घाटन दि.१६ एप्रिल रोजी आमिर हबीब व - कालिदास आपेट यांच्या हस्ते होणार आहे. तर दुपारी चार वाजता शेतीमालाचा उत्पादन खर्च कसा काढावा यावर तालुका कृषी अधिकारी गणेश बादाडे व गौरव बापमारे हे मार्गदर्शन करणार आहेत तर दुपारच्या सत्रात शेतीमालाचे रास्त भाव आणि हमीभाव व शेतमजुराची समस्या यावर शिवाजी नांदखिले व कालिदास आपेट हे मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच रात्रीच्या सत्रात शेतकरी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या संमेलनात कवी प्रभाकर साळेगावकर हे उपस्थित राहणार आहेत तर दि.१७ रोजी शेतकऱ्यांना शेती अभ्यासक इरफान शेख, किसान पुत्र अच्युत गंगणे लक्ष्मण वडले शरद तांदळे कादंबरीकार हे मार्गदर्शन करणार असून किसान सभेचे अॅड अजय बुरांडे, नारायण गोले, मोहन जाधव, हरीश घायत, मच्छिद्र जगताप, रामेश्वर गाडे, आजीमुद्दीन शेख, अनुरथ काशीद, राधाकिसन गडदे हे उपस्थित राहणार असून अंधश्रद्धा निर्मूलन यावर हेमंत धानोरकर अंबाजोगाई यांचे मार्गदर्शन होणार आहे. तर शेवटच्या सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून रघुनाथ दादा पाटील व विलास शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande