मराठवाडा साहित्य संमेलनात मांडले १४ ठराव
बीड, 13 एप्रिल (हिं.स.)। मराठवाडा साहित्य परिषद आणि भवानी विद्यार्थी कल्याण प्रतिष्ठान, शांतीवन आर्वी यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित ४५ व्या मराठी साहित्य संमेलनात १४ ठराव घेण्यात आले. बँकानी शेतकऱ्यांना शेती कर्ज द्यावे, मराठवाड्यातील रेल्वे
मराठवाडा साहित्य संमेलनात मांडले १४ ठराव


बीड, 13 एप्रिल (हिं.स.)।

मराठवाडा साहित्य परिषद आणि भवानी विद्यार्थी कल्याण प्रतिष्ठान, शांतीवन आर्वी यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित ४५ व्या मराठी साहित्य संमेलनात १४ ठराव घेण्यात आले. बँकानी शेतकऱ्यांना शेती कर्ज द्यावे, मराठवाड्यातील रेल्वे मार्ग दुहेरी करावेत, कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याचे हक्काचे २१ टएमसी पाणी द्यावे, शेतमालाला हमी भाव देऊन जागतिक बाजारपेठ खुली करावी, पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करणे थांबवावे, जादूटोणा कायद्याची कडक अमलाबजावणी करावी. प्रत्येक पोलीस ठाण्यात जादूटोणा विरोधी कक्ष सुरु करावा अशा मागण्यांचे ठराव संमेलनात संमत करण्यात आले.

यावेळी संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ.म. शहाजिंदे, कौतिकराव ठाले, आसाराम लोमटे, रामचंद्र तिरुके, दीपा क्षीरसागर, रामचंद्र काळुंखे, डॉ. अशोक बेलखोडे, गणेश मोहिते, दीपक नागरगोजे, भास्कर बडे, कावेरी नागरगोजे यांच्यासह साहित्यिक, कवी आणि साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संमेलन अध्यक्ष फ. म. शहाजिंदे यांनी अध्यक्षीय समारोप केला. ते म्हणाले, बोलणे एक आणि वागणे दुसरे अशी तफावत समाजात रुजली आहे. घटनेवर सारेच बोलतात मात्र प्रत्यक्ष आचरण घटनेच्या तत्वानुसार कोणीच करत नाहीत.

मग आपल्या बोलण्या आणि वागण्यातच तफावत असेल तर सामाजिक एकता संपली, बंधुभाव संपला हे बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही, असे सांगत साहित्याने समाज मनाला आकार दिला. साहित्यामुळे समाजात प्रगल्भता आली. साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील म्हणाले, सामाजिक काम हे विस्तवावरून चालण्यासारखे आहे. कारण समाजाची परिस्थिती खूप विदारक बनत आहे. अशा परिस्थितीत मराठवाडा साहित्य संमेलनात भीषण सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारे परिसंवाद ठेवले. संमेलनात अशी चर्चा ठेवणे धाडसाचे असते. तर दीपक नागरगोजे म्हणाले, मराठवाडा साहित्य परिषदेने आम्हाला राज्यभरातील साहित्यिक आणि सारस्वतांची सेवा करण्याची संधी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande