मराठवाडा विद्यापीठात 18 तास वाचन उपक्रम; 150 हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
छत्रपती संभाजीनगर, 13 एप्रिल (हिं.स.) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ज्ञान स्रोत केंद्र (ग्रंथालय) येथे रविवारी सलग 18 तास वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भारतरत
अ


छत्रपती संभाजीनगर, 13 एप्रिल (हिं.स.) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ज्ञान स्रोत केंद्र (ग्रंथालय) येथे रविवारी सलग 18 तास वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. ज्ञान स्रोत केंद्रात या अभियानाचा प्रारंभ कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी संचालक डॉ. वैशाली खापर्डे, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. कैलास अंभुरे, उपग्रंथपाल डॉ. सतीश पद्मे तसेच डॉ. विलास इप्पर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या उपक्रमात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यापीठ परिसरासह बाहेरील विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवला. --------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande