परभणीत 18 तास अभ्यासातून डॉ. बाबासाहेबांना अनोखे अभिवादन
परभणी, 13 एप्रिल (हिं.स.)। जगातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून ओळख असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सलग १८ तास अभ्यास करून अभिवादन करण्याची अनोखी परंपरा सर्वधर्मीय फुले-शाहू-आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने गेल्या १८ वर्षांपासून जपली ज
अ


परभणी, 13 एप्रिल (हिं.स.)।

जगातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून ओळख असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सलग १८ तास अभ्यास करून अभिवादन करण्याची अनोखी परंपरा सर्वधर्मीय फुले-शाहू-आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने गेल्या १८ वर्षांपासून जपली जात आहे. यावर्षीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सारंग अभ्यासिका, उघडा महादेव परिसर या १८ तासांच्या अभ्यास अभियानाला प्रारंभ झाला.

महोत्सवाचे अध्यक्ष समीर दुधगावकर, संयोजक प्राचार्य विठ्ठल घुले, डॉ. सुनिल जाधव, यशवंत मकरंद, संजीव आढागळे, प्रा. रमेश शिंदे, मयुरी गिरी, मोतीराम कदम आदी मान्यवरांनी सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना समीर दुधगावकर यांनी मानवी मेंदूत अपार क्षमता असून, सर्वांगीण प्रगतीचा मार्ग ज्ञान आणि अभ्यासातूनच खुला होतो, असे प्रतिपादन केले.

या १८ तासांच्या अभ्यास उपक्रमात भक्ती कदम, सोनम धुतडे, गौरी कदम, तेजस्विनी गायकवाड, असावरी घोंगडे, मयुरी गिरी आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande