आरमोरीत क्षुल्लक कारणावरून मुलाने केला बापाचा निर्घृण खून
गडचिरोली, 13 एप्रिल (हिं.स.) गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील एका शुल्लक कारणावरून रविवारी आपल्या वडिलांचा कुऱ्हाडीने वार करून रात्री साडेसात वाजताच्या सुमारास पालोरा मार्गावर खून केल्याची घटना घडली. सविस्तर वृत्त असे की गडचिरोली जिल्ह्यातील आरमो
मयत  वडील आणि आरोपी मुलगा


गडचिरोली, 13 एप्रिल (हिं.स.)

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील एका शुल्लक कारणावरून रविवारी आपल्या वडिलांचा कुऱ्हाडीने वार करून रात्री साडेसात वाजताच्या सुमारास पालोरा मार्गावर खून केल्याची घटना घडली. सविस्तर वृत्त असे की गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील ताडुरवार नगरात राहणारे देवाजी आडकू धकाते वय 65 वर्ष असे मृत व्यक्तीचे नाव आहे या मृत व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी आरोपी योगेश देवाजी धकाते त्याचा स्वतःचा मुलगा वय 25 वर्षे यास अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत देवाजी धकाते यांचा पालोरा गावाजवळ विटा भट्टीचा व्यवसाय आहे त्यांना पाच मुली व योगेश नामक मुलगा आहे सर्व मुलीचे आधीच विवाह झालेले आहेत. वर्षभरापूर्वी देवाजींनी योगेशचेही लग्न लावून दिले योगेश हा पत्नीसह आपल्या आई-वडिलाकडेच राहायचा दोघेही पिता-पुत्र दररोज विटा भट्टीवर जायचे तेथे दिवसभर कष्ट केल्यानंतर संध्याकाळी आरमोरीला परत यायचे देवाजी धकाते हे योगेशच्या पत्नीला रागावत असत शिवाय गर्भवती असतानाही तिला कामे करण्यास सांगत ही बाब योगेशला आवडत नव्हती त्यामुळे पिता-पुत्रांमध्ये अधून मधून वाद होत होता राग मनात ठेवून योगेश ने वडिलांना संपवण्याचा विडा उचलला.

अशा पद्धतीने केला खून रविवारी सायंकाळी वीटभट्टीवरून वडील घरी निघण्यापूर्वीच योगेश घराकडे परत जायला लागला पालोरा गावाजवळ सुनसान स्थळी रेल्वेच्या एका पुलाच्या जवळ योगेश दबा धरून होता साडेसात वाजताच्या सुमारास वडील देवाजी मुलीशी फोनवर बोलत बोलत सायकलने येत होते देवाजी दिसताच योगेशने त्याच्यावर कुराडीने मागून सपासप वार केला त्याच्या किंकाळ्या मुलीने ऐकल्या मात्र संवाद बंद झाला त्यामुळे मुलीला काहीतरी विपरीत घडल्याची शंका आली तिने तात्काळ शेजारी नागरिकांना माहिती दिली

मुलाची संशयास्पद हालचाल

योगेशने वडिलांना संपल्यानंतर रक्ताने माखलेली कुऱ्हाड पाण्याने धुऊन जणू काही घडलेच नाही अशा अविर्भावात घर गाठले त्यानंतर तो आई चुलत भाऊ अन्य मंडळी सोबत वडिलांना शोधण्यासाठी निघाला अखेर रेल्वेच्या बोगद्याजवळ देवाजीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला नागरिकांनी मोठी गर्दी केली सुरुवातीला पोलीस विभागाने वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तात्काळ बोलावून देवाजीचा मृत्यू असल्याची शंका वाघाने जर याला मृत्यू केले नाही ना असा संशय संशय वाटू लागल्याने वनविभागाची टीम तसेच आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी पोलीस स्टेशनची संपूर्ण टीम ही घटनास्थळी पोहोचले योगेश च्या हालचाली संशयापद वाटल्याने पोलिसांनी प्रथम त्याचा अभ्यासपुर्ण विचारपूस केली अखेर त्यांनी वडिलांचा खून केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याला अटक केली आहे सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री लामतुरे पोलीस उपनिरीक्षक नरेश सहारे तसेच हवालदार व पोलीस शिपाई करीत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande