वनपट्टा धारक शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर आयडी’ नोंदणी मोहीम सुरू
अकोला, 13 एप्रिल (हिं.स.) : राज्यात डिजिटल कृषी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजना अंतर्गत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर आयडी’ नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार, कृषि विभागाच्या विवि
वनपट्टा धारक शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर आयडी’ नोंदणी मोहीम सुरू


अकोला, 13 एप्रिल (हिं.स.) :

राज्यात डिजिटल कृषी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजना अंतर्गत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर आयडी’ नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.

शासनाच्या निर्देशानुसार, कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी आवश्यक राहणार आहे. विशेषतः वनहक्क अधिनियम 2006 अंतर्गत हक्क प्राप्त वनपट्टा धारक शेतकऱ्यांसाठी राज्यभर विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेत वनपट्टा धारक शेतकऱ्यांनी आपल्या जवळील नागरी सुविधा केंद्रात भेट देऊन आवश्यक कागदपत्रांसह ‘फार्मर आयडी’ नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, या नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या विविध योजना, अनुदान, पीक विमा, नैसर्गिक आपत्ती सहाय्य तसेच इतर डिजिटल कृषी सेवांचा लाभ सहजपणे मिळणार आहे.

प्रशासनाने सर्व पात्र शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घेऊन शासनाच्या योजनांचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande