अकोल्यात बुधवारी ‘पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’
अकोला, 13 एप्रिल (हिं.स.) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि श्रीमती मेहेरबानू विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 15 एप्रिल रोजी ‘पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. हा मेळाव
अकोल्यात बुधवारी ‘पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’


अकोला, 13 एप्रिल (हिं.स.) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि श्रीमती मेहेरबानू विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 15 एप्रिल रोजी ‘पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा महाविद्यालयाच्या परिसरात सकाळी 10 वाजता होणार आहे.

या रोजगार मेळाव्यात टाटा कन्स्टंन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या नामांकित आयटी कंपनीद्वारे पदवीधर उमेदवारांची भरती केली जाणार आहे. बीबीए, बी.कॉम., बी.ए., बी.एस्सी (जनरल), बीसीए, बीसीसीए तसेच एम.ए. आणि एम.कॉम. या शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार सहभागी होऊ शकतात.

मात्र, 2024, 2025 आणि 2026 मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवारच या भरती प्रक्रियेसाठी पात्र असतील. इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य असून, दिलेल्या लिंकवर अर्ज भरावा लागणार आहे.

निवड प्रक्रियेत प्रथम लेखी परीक्षा आणि त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी अद्ययावत बायोडेटा, सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि आवश्यक ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास केंद्राच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. अकोल्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande