
बीड, 13 एप्रिल (हिं.स.)।
अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द येथील २० वर्षीय तरुण अथर्व महादेव ढगे याचा भीषण रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. धानोरा येथून अंबाजोगाईकडे येत असताना लोखंडी सावरगाव नजीक अथर्व आणि समोरून येणाऱ्या अंबाजोगाई - संभाजीनगर शिवाई बसची (क्रमांक एमएच ४९ बीझे ९५८१) जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की गंभीर दुखापतीमुळे अथर्वचा जागीच प्राण गेला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि पोलिसांना पाचारण केले. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ऐन तारुण्यात अथर्वचा असा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण धानोरा खुर्द परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis