आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपरी शहरातील वाहतुकीत बदल
पिंपरी, 13 एप्रिल (हिं.स.)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. तसेच पिंपरी व दापोडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभ
Babasheab ambedkar


पिंपरी, 13 एप्रिल (हिं.स.)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत. तसेच पिंपरी व दापोडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी येत असतात. त्यामुळे मिरवणूक मार्गावरील तसेच अभिवादन ठिकाणाकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. हा बदल दुपारी बारा ते रात्री दहा या कालावधीसाठी असेल, तरी नागरिकांनी प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

चिंचवडमधील लोकमान्य रुग्णालय चौकाकडून महावीर चौक (लोकमान्य रुग्णालय चौकापासून डावीकडे वळून दळवीनगर तसेच महावीर चौकातून डावीकडून वळून) रिव्हर व्हयू चौकाकडून महावीर चौक (चिंचवड फार्म मार्गाने वाल्हेकरवाडी, रावेतमार्गे मुंबईकडे जातील तसेच भोसरीकडे जाणारी वाहने ही बिजलीनगर चौक, संभाजी चौक, भक्ती-शक्ती चौक मार्गे) बसवेश्वर चौकाकडून महावीर चौक (केएसबी चौकाकडून येणारी वाहने सायन्स पार्कमार्गे) महावीर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे सेवा रस्त्याने येण्यास (डी मार्ट इनग्रेड सेपरेटर मार्गे, डी मार्ट पंक्चर येथून डाव्या बाजूने ऑटो क्लस्टरमार्गे) नाशिक फाट्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (डेअरी फार्म ग्रेड सेपरेटर इन व एचपी पंप खराळवाडी ग्रेड सेपरेटर इन तसेच कृष्णा हॉटेल येथून डाव्या बाजूने वळून साई चौक)

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande