विकसित भारत-२०४७' च्या संकल्पपुर्तीकरिता शासन प्रयत्नशील-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
पुणे, 13 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारत-2047’ च्या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी राज्यात ‘विकसित महाराष्ट्र’ घडविण्याच्या दिशेने विविध लोककल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद
Jdjd


पुणे, 13 एप्रिल (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारत-2047’ च्या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी राज्यात ‘विकसित महाराष्ट्र’ घडविण्याच्या दिशेने विविध लोककल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत लोणीकंद येथे आयोजित समाधान शिबिरात ते बोलत होते. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकाभिमुख व पारदर्शक प्रशासनाच्या प्रेरणेतून हे अभियान राबविण्यात येत आहे. या शिबिराच्या माध्यमातून सुमारे 20 गावांतील नागरिकांना 45 विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, नागरिकांचे जीवनमान सुलभ करण्याचा उद्देश आहे.

यावेळी राज्यभरात झालेल्या या उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर महसूल सेवा वितरित करण्यात आल्या. सुमारे 40 हजार फेरफार दुरुस्त्या, 20 हजार सातबारा दुरुस्त्या, 1 लाख 50 हजार संगणकीकृत सातबारे वाटप, तसेच लाखो प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

मंत्री बावनकुळे यांनी पुढे सांगितले की, शासन निर्णयाद्वारे अधिकारांचे विकेंद्रीकरण, भूमिअभिलेखांचे आधुनिकीकरण, तसेच शेतजमीन अकृषक प्रक्रियेतील सुलभीकरण यांसारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकरी व नागरिकांच्या हितासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी महसूल विभागाला ‘शासनाचा कणा’ संबोधत नागरिकांना जलद व पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगितले. तर इतर मान्यवरांनी या अभियानाचे कौतुक करत नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी असे शिबिर उपयुक्त ठरत असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमात महसूल विभागाच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वितरण आणि नागरिकांसाठी QR कोड सेवांचे लोकार्पण करण्यात आले.

लोणीकंद येथे झालेल्या या समाधान शिबिरामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर शासकीय सेवांचा लाभ मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande