
छत्रपती संभाजीनगर, 13 एप्रिल (हिं.स.)। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सिद्धार्थ नगर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दर्गा रोड परिसरात स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाअंतर्गत सिद्धार्थ नगर नागरी वस्ती तसेच सामाजिक न्याय भवन परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्रीमती गीता गुठ्ठे, नगरसेवक कयुमखॉ पठाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारार्थी मधुकर मांजरमकर, बबन मोरे, श्रीमती शांताबाई मोरे, प्रा. सुखदेव बलखंडे, जिल्हा प्रकल्प अधिकारी (बार्टी) सिद्धार्थ गोवंदे, विशेष अधिकारी अमोल घुगे, गृहपाल श्रीमती सुलोचना ढोणे, विजयकुमार सोनटक्के, नगर परिषद निरीक्षक बाळू नागरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समता दूत सुरेश पठाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ गोवंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सामाजिक न्याय विभाग तसेच शासकीय वसतिगृहातील गृहपाल व कर्मचारीवृंद यांनी मोलाचे सहकार्य केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis