लातूरात आयपीएल सट्टा जुगारावर कारवाई, ₹4.50 लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर, 13 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने आयपीएल क्रिकेट सट्टा जुगाराच्या अड्ड्यावर धडक कारवाई करत दोन आरोपींना रंगेहाथ अटक केली. या कारवाईत तब्बल ₹4 लाख 50 हजा
पोलीस कारवाई


लातूर, 13 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने आयपीएल क्रिकेट सट्टा जुगाराच्या अड्ड्यावर धडक कारवाई करत दोन आरोपींना रंगेहाथ अटक केली. या कारवाईत तब्बल ₹4 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, निलंगा येथील आयटीआय कॉलेज परिसरात गस्तीदरम्यान पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दादगी ते भंगार चिंचोली रोडवरील दादगी शिवारात काही जण आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा जुगार चालवत आहेत. या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी सायंकाळी सुमारे 8.15 वाजता नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकला.

या कारवाईत लखन ऊर्फ बाबा महापु कांबळे (वय 29) व पवन दयानंद कांबळे (वय 26, दोघेही रा. मिलिंद नगर पेठ, निलंगा) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या अंगझडतीत क्रिकेट सट्ट्यासाठी वापरण्यात येणारे 6 मोबाईल फोन, सट्टा व्यवहारांची नोंद असलेली कागदपत्रे, बॉलपेन तसेच होंडा अॅक्टिवा (MH 24 BF 7217) असा एकूण ₹4,50,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राथमिक चौकशीत आरोपी आयपीएलमधील सामन्यावर फोनद्वारे सट्टा स्वीकारत असल्याचे समोर आले. हा सट्टा व्यवहार मुंबईतील ‘रवि शेट’ नावाच्या बुकीसाठी चालविला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. आरोपी दररोजचा सट्टा व्हॉट्सअॅपद्वारे बुकीकडे पाठवत असून त्यांना 10 टक्के कमिशन मिळत असल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच या रॅकेटमागील मुख्य बुकीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande