खोपोलीत ट्रकमधून डिझेल चोरी; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
रायगड, 13 एप्रिल (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाणे हद्दीत डिझेल चोरीची घटना घडली असून अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौजे खोपोली, सारसनफाटा येथे राम पेट्रोलपंपाजवळ घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कर्नाटक राज्यातील
Diesel theft from truck in Khopoli; Case registered against unknown person


रायगड, 13 एप्रिल (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाणे हद्दीत डिझेल चोरीची घटना घडली असून अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौजे खोपोली, सारसनफाटा येथे राम पेट्रोलपंपाजवळ घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कर्नाटक राज्यातील बेळगावी जिल्ह्यातील रहिवासी असून ते ट्रक क्रमांक एमएच ४३/सीई ९५०२ घेऊन खोपोली येथे आले होते. त्यांनी आपला ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून केबिनमध्ये झोप घेतली होती. त्याच दरम्यान अज्ञात चोरट्याने ट्रकच्या डिझेल टाकीचा लॉक तोडून सुमारे २५ हजार ५७३ रुपयांचे डिझेल चोरी करून नेले.

या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 130/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार दबडे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande