कवडगाव (बु.) येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
बीड, 13 एप्रिल (हिं.स.) : वडवणी तालुक्यातील कवडगाव (बु.) येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा 19 एप्रिलपासून सुरू होणार असून सात दिवस चालणार आहे. या सप्ताहादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमां
कवडगाव (बु.) येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा


बीड, 13 एप्रिल (हिं.स.) : वडवणी तालुक्यातील कवडगाव (बु.) येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा 19 एप्रिलपासून सुरू होणार असून सात दिवस चालणार आहे.

या सप्ताहादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये काकडा भजन, विष्णू सहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन तसेच दुपारच्या सत्रात रामायण ग्रंथ वाचन होणार आहे.

दररोज रात्री 9 ते 11 या वेळेत बीड जिल्ह्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनसेवा होणार असून त्यानंतर हरिजागराचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात बळीराम महाराज निपटे, पुरुषोत्तम महाराज शास्त्री, श्रीकृष्ण महाराज यादव, गणेश महाराज लोंढे, शिवानंद महाराज शास्त्री (परतूर) तसेच मधुसूदन महाराज गवारे यांची कीर्तनसेवा होणार आहे.

रविवार, 26 एप्रिल रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत शांतिब्रह्म पांडुरंग महाराज मुंडे यांचे अमृततुल्य काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande