सोन्याच्या दरात घसरण; ग्राहकांना दिलासा
जळगाव, 13 एप्रिल (हिं.स.) | सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने बाजारपेठेत सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची लगबग पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात वाढलेल्या सोन्याच्या दराने खरेदीदारांच्या चिंतेत भर घातली होती; मात्र सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिव
Gold and silver


जळगाव, 13 एप्रिल (हिं.स.) | सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने बाजारपेठेत सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची लगबग पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात वाढलेल्या सोन्याच्या दराने खरेदीदारांच्या चिंतेत भर घातली होती; मात्र सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३८० रुपयांनी कमी झाले आहेत.

सोमवारी २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३८० रुपयांनी घसरून १,५२,४६० रुपयावर पोहोचले आहे. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ३०४ रुपयांनी घसरले असून १,२१,९६८ रुपये झाले आहेत.२२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३५० रुपयांनी घसरले असून हे दर १,३९,७५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं २८० रुपयांनी स्वस्त झालं असून हे दर १,११,८०० रुपये झाले आहेत. सोबतच १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २९० रुपयांनी घसरले असून १,१४,३४० रुपये झाले आहेत. दुसरीकडे सोमवारी चांदी दरातही मोठी घसरण झाली आहे. सोमवारी सकाळी चांदी दरात प्रति किलो ५००० रुपयापर्यंतची घसरण झाली आहे. यामुळे आता चांदीचा एक किलोचा दर २,५५,००० रुपयावर पोहोचला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande