सोलापूरात आमदार गोपीचंद पडळकर यांचा सत्कार; पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न
सोलापूर, 13 एप्रिल (हिं.स.)गोपीचंद पडळकर यांची सोलापूर जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी कार्यालय, सोलापूर येथे पदाधिकाऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देत पुढील कार्
gogo


सोलापूर, 13 एप्रिल (हिं.स.)गोपीचंद पडळकर यांची सोलापूर जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी कार्यालय, सोलापूर येथे पदाधिकाऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देत पुढील कार्यासाठी समर्थन व्यक्त केले. यानंतर आमदार पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत संघटनात्मक बळकटी, आगामी कार्यक्रमांचे नियोजन तसेच जिल्ह्यातील विविध राजकीय व सामाजिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, सरचिटणीस विकास वाघमारे, प्रदीप पाटील, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष बालाजी वाघमारे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मोजीब मुजावर, ज्येष्ठ नेते हनुमंत कुलकर्णी, सुभाष मस्के, माऊली हळणवर यांच्यासह जिल्ह्यायातील सर्व मंडळ अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande