श्री दत्त शिखर संस्थानमध्ये 19 एप्रिलला षोडशी दत्तनाम महापूजा
नांदेड, 13 एप्रिल (हिं.स.) : श्री दत्त शिखर संस्थानचे महंत मधुसूदन भारती महाराज यांचे देहावसान झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ 19 एप्रिल रोजी षोडशी दत्तनाम महापूजेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीसह राज्यभरातून तसेच परराज्या
श्री दत्त शिखर संस्थानमध्ये 19 एप्रिलला षोडशी दत्तनाम महापूजा


नांदेड, 13 एप्रिल (हिं.स.) : श्री दत्त शिखर संस्थानचे महंत मधुसूदन भारती महाराज यांचे देहावसान झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ 19 एप्रिल रोजी षोडशी दत्तनाम महापूजेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीसह राज्यभरातून तसेच परराज्यातून हजारो भाविक, साधू-संत उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थानतर्फे देण्यात आली आहे.

हा कार्यक्रम संस्थानचे 31 वे महंत डॉ. धनेश्वर भारती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असून पंचकस्नान जुन्या आखाड्याचे अध्यक्ष उमाशंकर भारती महाराज यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 6 वाजता तीर्थस्थापना व दत्तनाम गजराने होणार आहे. त्यानंतर सकाळी 10 ते 12 या वेळेत सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 पासून षोडशी विधी, भंडारा व महाप्रसाद होणार असून सायंकाळी 4 वाजता आनंद दत्त सत्र आणि खंडी दत्तनाम महापूजा पार पडेल. 20 एप्रिल रोजी सकाळी काकड आरतीने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने संस्थानतर्फे अन्नदान, पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय सेवांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नगरपंचायतीमार्फत स्वच्छता व आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे.

गर्दीच्या पार्श्वभूमीवर 19 एप्रिल रोजी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार असून काही भागांत खासगी वाहनांच्या प्रवेशावर मर्यादा घालण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande