
सोलापूर, 13 एप्रिल (हिं.स.)सागर कल्याणशेट्टी मित्रपरिवार आयोजित ‘हन्नूर केसरी पर्व – ५ वे’ या भव्य बैलगाडा शर्यतीला शर्यतप्रेमींकडून मोठा प्रतिसाद मिळाला. नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध आयोजनामुळे संपूर्ण स्पर्धा रोमांचक वातावरणात पार पडली. बैलगाड्यांच्या सुसाट वेगाने उपस्थित प्रेक्षकांना थरारक अनुभव दिला.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत १ ते ६ क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्या बैलगाड्यांचा सन्मान अक्कलकोट मतदारसंघाचे आमदार श्री. सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी आमदार श्री. सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महापालिकेचे महापौर श्री. विनायक कोंड्याल, कार्यकारिणी सदस्य श्री. शहाजी पवार, नगराध्यक्ष श्री. मिलन कल्याणशेट्टी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. इंद्रजीत पवार, आयोजक श्री. सागर कल्याणशेट्टी, नगरसेवक बिज्जू प्रधाने यांच्यासह हन्नूर गावातील मान्यवर व मोठ्या संख्येने शर्यतप्रेमी उपस्थित होते.
--------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड