प्रा. विनय पाटील यांच्या शैक्षणिक, कृषी, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव
कोल्हापूर, 13 एप्रिल (हिं.स.)। प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, कोल्हापूर या शतकमहोत्सवी शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूरच्या किमान कौशल्य व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रमुख प्रा. विनय गजानन पाटील त्यांनी केलेल्या श
प्रा. विनय गजानन पाटील गौरव समिती


कोल्हापूर, 13 एप्रिल (हिं.स.)। प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, कोल्हापूर या शतकमहोत्सवी शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूरच्या किमान कौशल्य व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रमुख प्रा. विनय गजानन पाटील त्यांनी केलेल्या शैक्षणिक, शेती, सामाजिक, सांस्कृक्तिक कीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करून त्यांचा यथोचित सपत्नीक सत्कार करण्याचा निर्णय प्रा. विनय गजानन पाटील गौरव समिती, कोल्हापूर व विविध संस्थांनी घेतलेला आहे. त्यानुसार शुकवार दि. १७ एप्रिल, २०२६ रोजी सायं. ०४.३० वाजता अमृतसिध्दी सांस्कृतिक भवन, कळंबा रोड, कोल्हापूर येथे आयोजित केला आहे. अशी माहिती प्राचार्य बी. एम. हिर्डेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी ते म्हणाले प्रा. विनय पाटील हे ३६ वर्षांच्या सेवेनंतर दि. ३१ मे, २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचा यथोचित गौरव

माजी आ. मालोजीराजे छत्रपती यांचे अध्यक्षतेखाली आणि पुणे शिक्षक आ. जयंत आसगांवकर, सहसंचालक (सेवानिवृत्त) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, पुणेचे चंद्रकांत निनाळे व ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे या प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार होणार असून या समारंभास हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह, वाळवाचे प्रमुख वैभव नायकवडी, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष बी.जी. बोराडे व चेअरमन डॉ.के.जी. पाटील यांची विशेष उपस्थिती असेल. या समारंभात 'विनय' या गौरव ग्रंथाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन केले जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande