लातूर परिमंडलातील १२.९८ लाख वीजग्राहकांचे मोबाइल क्रमांक नोंदणी
महावितरणच्या डिजिटल सेवांना प्रतिसाद लातूर, 13 एप्रिल (हिं.स.) : ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी महावितरणकडून सातत्याने विविध डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून वीजग्राहकांना घरबसल्या सेवा मिळाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत.
वीजबिल


महावितरणच्या डिजिटल सेवांना प्रतिसाद

लातूर, 13 एप्रिल (हिं.स.) : ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी महावितरणकडून सातत्याने विविध डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून वीजग्राहकांना घरबसल्या सेवा मिळाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत.

याच उपक्रमांतर्गत वीजबिल, वीजपुरवठा बंदचा कालावधी तसेच इतर महत्त्वाची माहिती ग्राहकांना एसएमएसद्वारे देण्यात येत आहे. लातूर परिमंडलातील एकूण १५ लाख २ हजार ९६२ वीजग्राहकांपैकी १२ लाख ९८ हजार ४० ग्राहकांनी आपले मोबाइल क्रमांक महावितरणकडे नोंदवले आहेत.

या परिमंडलात लातूर, बीड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांचा समावेश असून घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील १० लाख ६ हजार ३९३ ग्राहकांपैकी ९ लाख ३४ हजार ९८ ग्राहकांनी म्हणजेच ९२.८१ टक्के ग्राहकांनी मोबाइल क्रमांक नोंदणी केली आहे. कृषीपंप वर्गवारीतील ४ लाख ९६ हजार ५६९ ग्राहकांपैकी ३ लाख ६३ हजार ९४२ ग्राहकांनी (७३.२९ टक्के) नोंदणी केली आहे.

मंडलनिहाय आकडेवारीनुसार, लातूर मंडलात ५ लाख ३५ हजार ३८०, बीड मंडलात ४ लाख ९ हजार ९, तर धाराशिव मंडलात ३ लाख ५३ हजार ६५१ ग्राहकांनी मोबाइल क्रमांक नोंदवला आहे.

ज्या ग्राहकांनी अद्याप आपला मोबाइल क्रमांक नोंदवलेला नाही किंवा बदलायचा आहे, त्यांनी १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ व १८००-२३३-३४३५ या २४ तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा मोबाइल ऍपद्वारेही नोंदणी करता येईल, असे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी आवाहन केले आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande