जॅकसन ग्रुपने पाच नवीन ऊर्जा सोल्यूशन्स केले सादर
नवी दिल्ली, 13 एप्रिल (हिं.स.)। भारतातील आघाडीचा ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील जॅकसन ग्रुपने आपल्या व्यवसायात मोठा विस्तार करत पाच नवीन ऊर्जा सोल्यूशन्स सादर केले आहेत. कंपनीने जॅकसन जेनसेट एक्स्ट्रा, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम (बेस), सोलर
JAKSON Group  Introduces 5 New Energy Solutions


नवी दिल्ली, 13 एप्रिल (हिं.स.)। भारतातील आघाडीचा ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील जॅकसन ग्रुपने आपल्या व्यवसायात मोठा विस्तार करत पाच नवीन ऊर्जा सोल्यूशन्स सादर केले आहेत. कंपनीने जॅकसन जेनसेट एक्स्ट्रा, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम (बेस), सोलर किट, मोबाईल लाईट टॉवर आणि इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर्स ही उत्पादने बाजारात आणली आहेत. आर्थिक वर्ष २६ मध्ये ९,००० कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळवत कंपनीने ऊर्जा क्षेत्रात आपली भक्कम पकड अधिक मजबूत केली आहे.

गेल्या ७८ वर्षांपासून गुणवत्ता, विश्वास आणि उत्कृष्ट अभियांत्रिकीसाठी ओळखल्या जाणाऱ्या जॅकसन ग्रुपने आता वीज निर्मिती, ऊर्जा साठवण, सौर ऊर्जा आणि स्वच्छ ऊर्जा या सर्व क्षेत्रांत एकत्रित आणि भविष्यासाठी सज्ज अशी प्रणाली उभारण्यावर भर दिला आहे. कंपनीचे अध्यक्ष समीर गुप्ता यांनी सांगितले की, नवकल्पनांच्या माध्यमातून प्रगती साधणे हेच कंपनीचे उद्दिष्ट असून मोठ्या महसुलामुळे आता अधिक व्यापक प्रमाणात काम करण्याची क्षमता आणि जबाबदारी दोन्ही वाढल्या आहेत.

उपाध्यक्ष सुंदीप गुप्ता यांनी नमूद केले की, आजच्या काळात ग्राहकांना कार्यक्षम, विश्वासार्ह आणि भविष्यासाठी तयार ऊर्जा सोल्यूशन्सची गरज आहे आणि नवीन उत्पादनांमुळे विविध क्षेत्रातील ग्राहकांच्या गरजा अधिक प्रभावीपणे पूर्ण करता येतील. तर डिस्ट्रिब्युटेड एनर्जी बिझनेसचे सीईओ सुधांशु पोखरियाल यांनी सांगितले की, कंपनी पर्यावरणपूरक आणि विश्वासार्ह उपाय देण्यास कटिबद्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या ऊर्जा गरजा अधिक सुलभपणे पूर्ण करता येतील.

जॅकसन जेनसेट एक्स्ट्रा हे छोटे, कॉम्पॅक्ट आणि विश्वासार्ह वीज बॅकअप उपकरण असून लहान दुकाने, घरे, बंगले आणि एटीएमसाठी ते अत्यंत उपयुक्त आहे. कमी इंधन वापर आणि कमी आवाज ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम म्हणजेच बेस ही ऊर्जा साठवण प्रणाली असून ती घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी योग्य आहे. ३ केव्हीएपासून १५ केव्हीएपर्यंतच्या क्षमतेत उपलब्ध असलेली ही प्रणाली वीज खंडित झाल्यावर बॅकअप देते तसेच दीर्घकालीन वापरासाठी सुरक्षित आणि देखभालमुक्त आहे.

सोलर किट हे पूर्ण छतावरील सौर ऊर्जा सोल्यूशन असून त्यामध्ये सोलर पॅनल, इन्व्हर्टर, डीसीडीबी, एसीडीबी, एमसी४ कनेक्टर, लाईटनिंग अरेस्टर आणि अर्थिंग किट यांचा समावेश आहे. म्हणजेच ग्राहकांना एकाच पॅकेजमध्ये संपूर्ण सोलर सिस्टीम उपलब्ध होते. मोबाईल लाईट टॉवर हे कठीण परिस्थितीत वापरण्यासाठी तयार केलेले असून ते ४० ते ५० तास सतत कार्यरत राहू शकते आणि त्याचे आयुष्य ५०,००० तासांपर्यंत आहे. संरक्षण, बांधकाम, आपत्ती व्यवस्थापन आणि बाह्य कार्यक्रमांसाठी हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

याशिवाय जॅकसन ग्रुपने बेंगळुरूमधील एका कंपनीसोबत भागीदारी करून इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात प्रवेश केला आहे. यामुळे त्यांनी इलेक्ट्रिक तीन-चाकी वाहनांची नवीन श्रेणी सुरू केली आहे. या सर्व नवीन उत्पादनांमुळे जॅकसन स्वच्छ, स्मार्ट आणि मजबूत ऊर्जा प्रणाली तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कंपनी भविष्यातील गरजांनुसार नवीन आणि उपयुक्त उपाय देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande