नंदुरबार येथे डॉ. आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम’ उत्साहात
नंदुरबार, 13 एप्रिल (हिं.स.) । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राज्यात 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम’ साजरा केला जात असून, या उपक्रमांतर्गत नंदुरबार येथे विविध जनहित कार्यक्रमांचे आय
रक्तदान शिबीर


नंदुरबार, 13 एप्रिल (हिं.स.) । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राज्यात 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम’ साजरा केला जात असून, या उपक्रमांतर्गत नंदुरबार येथे विविध जनहित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

नंदुरबार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबीर, मेळावा तसेच रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पडले, अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी दिली.

कार्यक्रमात शासकीय अभियोक्ता श्रीमती खत्री आणि डी. एस. बिरारे यांनी ‘आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी नियम 2010’ याविषयी मार्गदर्शन केले. तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक बारकू पाटील, प्रतापराव चव्हाण, के. डी. गिरासे आणि सेवानिवृत्त प्राध्यापक इंदवे सर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या हक्क व कल्याणाबाबत सविस्तर माहिती दिली.

सामाजिक बांधिलकी जपत आयोजित रक्तदान शिबिरात नागरिक आणि समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले.

कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास देशमुख यांनी केले, तर नियोजनाची जबाबदारी शंकर महाजन यांनी पार पाडली. सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी सर्व रक्तदात्यांचे व उपस्थितांचे आभार मानले.

---------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande