
जळगाव, 13 एप्रिल (हिं.स.) जास्त नफ्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर बँक खात्याची माहिती घेत शेतकऱ्याची तब्बल २ लाख ९२ हजार ३६३ रुपयांची संशयिताने फसवणूक केली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुरज कुमार ३६ वर्षीय तक्रारदार शेतकरी जळगाव तालुक्यातील रहिवासी आहेत. १ जानेवारी ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत तक्रारदार यांच्या मोबाइल टेलिग्राम या सोशल मीडिया ॲपवर त्यांना लिंक आली. ती लिंक त्यांनी ओपन केली. रजिस्ट्रेशन केले. त्यानंतर टेलिग्रामवरुन अज्ञात इसमाने शेतकऱ्याचा विश्वास संपादन केला. त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन अधिक रक्कम मिळेल, असे आमिष दाखविले. तक्रारदार यांच्या टेलिग्रामवर प्राप्त झालेल्या युपीआय तसेच सुरज कुमार याचे नावे असलेले पंजाब अँड सिंध बँक झील पटलाला यावर तक्रारदार यांच्या स्टेट बँक खात्यातून युपीआयव्दारे वेळोवेळी पैसे ट्रान्सफर केले. एअरपाझ स्टार्ट ट्रॅव्हिलिंग नोव यावर तक्रारदार यांचे नाव तयार झालेल्या खात्यावर (वायलेट) मध्ये वाढीव रक्कम दाखविली. त्यानंतर संशयिताने २ लाख ९२ हजार ३६३ रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकऱ्याने पोलिसात कैफियत मांडली. याप्रकरणी सुरज कुमार संशयित बँक खाते तसेच इतर अज्ञात इसमाविरोधात तालुका पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर