रत्नागिरीत आंबा व्यापाऱ्याची स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या
रत्नागिरी, 13 एप्रिल, (हिं. स.) : तोणदे (ता. रत्नागिरी) येथील प्रसिद्ध आंबा व्यापारी रूपेश नागवेकर यांनी राहत्या घरी स्वतःवरच गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी
रूपेश नागवेकर


रत्नागिरी, 13 एप्रिल, (हिं. स.) : तोणदे (ता. रत्नागिरी) येथील प्रसिद्ध आंबा व्यापारी रूपेश नागवेकर यांनी राहत्या घरी स्वतःवरच गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असून तपास सुरू करण्यात आला आहे.रूपेश नागवेकर हे रत्नागिरीतील आंबा व्यापार क्षेत्रातील परिचित नाव होते. हापूस आंबा व्यापारात त्यांचा चांगला जम बसलेला होता. स्थानिक स्तरावर एक यशस्वी आणि सक्रिय व्यापारी म्हणून त्यांची ओळख होती. ते हापूस रिसॉर्टचे मालक असलेल्या नागवेकर कुटुंबातील मोठे बंधू होते. आजारपण आणि आर्थिक अडचणींमुळे ते मानसिक तणावाखाली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र आत्महत्येमागील नेमके कारण काय होते, हे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. सध्या कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande