
बीड, 13 एप्रिल (हिं.स.)।
बीड येथील एका खाजगी
वसतीगृहातून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. तक्रार देवूनही पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत. मध्यरात्रीपर्यंत मुलींचा शोध न लागल्यास पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.
शहरातील कॅनॉल रोड परिसरामध्ये असणाऱ्या शिंदेनगर येथील एका खाजगी वसतीगृहात ठेवण्यात आलेल्या दोन अल्पवयीन मुली बेपत्ता आहेत. दहा फुटाच्या कंपाऊंड वॉलच्या भींती चढून त्या जावू शकत नाहीत. गेटवर जर कायम वॉचमन असेल तर या मुली बेपत्ता कशा झाल्या असा सवाल उपस्थित केला जात आहे. घटना घडल्यानंतर वसतीगृह चालकाने पोलिसांना
याबाबत कळवले. पोलिसांनी चौकशी सुरू केली. घटनेची माहिती संबंधित मुलींच्या पालकांना देण्यात आली. अत्यंत गरिब आणि सामान्य कुटुंबातील या दोन मुली शिक्षणासाठी बीडमध्ये आठ महिन्यापूर्वी दाखल झाल्या होत्या. शहरातील कोणतीही माहिती त्यांना नाही. शाळेला जाण्यासाठी वसतीगृहाचे वाहन आहे. त्यामुळे त्या बाहेर जाण्याचा प्रश्नच येत नाही. मग मुली बेपत्ता कशा झाल्या असा संतप्त सवाल उपस्थित झाला. गायब झालेल्या मुलींच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर ठाण्यात उशिराने गुन्हा दाखल झाला. सुत्रांच्या माहितीनुसार सदरील दोन्ही मुली बीड-पुणे प्रवासादरम्यान ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis