
लातूर, 13 एप्रिल (हिं.स.)।
: जिल्ह्यात 14 एप्रिल, 2026 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी लातूर जिल्ह्यातील सर्व किरकोळ अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिले आहेत. महाराष्ट्र मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 नुसार तसेच नमूद कायद्यांतर्गत केलेल्या विविध नियमानुसार जिल्ह्यातील सर्व किरकोळ अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध मुंबई दारुबंदी कायदा 1949 व अनुषंगिक नियमांच्या आधारे कडक कारवाई करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis