पिंपरी-चिंचवड महापालिकेतील चुकीच्या कामांवर अंकुश हीच भाजपाची कार्यप्रणाली
पिंपरी, 13 एप्रिल (हिं.स.)पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तब्बल ५२ कोटी रुपयांची बिले लेखा विभागातील अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने अदा केली. यामध्ये ठेकेदार किंवा नगरसेवक यांचा दोष नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांने अधिकारांचा गैरवापर केला आहे. त्यावर भाजपा
PCMC


पिंपरी, 13 एप्रिल (हिं.स.)पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तब्बल ५२ कोटी रुपयांची बिले लेखा विभागातील अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने अदा केली. यामध्ये ठेकेदार किंवा नगरसेवक यांचा दोष नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांने अधिकारांचा गैरवापर केला आहे. त्यावर भाजपाच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत पर्दाफाश केला. पिंपरी-चिंचवडकरांनी विश्वासाने सलग दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीला सत्ता स्थापनेची संधी दिली. त्यामुळे शहरवासीयांच्या विश्वासाला आम्ही कदापि तडा जावू देणार नाही. ‘‘चुकीच्या कामांना अंकूश हीच भाजपाची कार्यप्रणाली आहे’’ अशी भूमिका भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी मांडली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमधील तब्बल ५२ कोटी रुपयांच्या आर्थिक प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी यावर प्रकाश टाकला आणि कारवाईची मागणी केली. मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापालिका विधी व कायदा विभागाने सदरबाबत लेखी अभिप्राय नोंदवला आहे. ‘‘लेखा विभागाकडून अदायगी केलेली बिलांना स्थायी समिती आणि मुख्य सभेची मान्यता घेणे बंधनकारक आहे.’’ असा अभिप्राय आला. त्यामुळे जैन यांच्या चुकीच्या कामांचा पर्दाफाश झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande