
बीड, 13 एप्रिल (हिं.स.)।पाटोदा तालुका औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली. यात अध्यक्षपदी दिगंबर नाईकनवरे आणि उपाध्यक्षपदी बबन पवार यांची निवड करण्यात आली.
तब्बल तीस वर्षे अध्यक्ष पदी राहून बंद अवस्थेतील संस्था पुनर्जीवित आणि नामांकित करुन या निवडणुकीत 'किंगमेकर'ची भूमिका बजावत ह.भ.प. छगन मुळे यांनी स्वतः संस्थेच्या प्रगतीसाठी तरुणाच्या हाती सूत्रे दिल्याचे त्यांचे कौतूक झाले. पाटोदा तालुका औद्योगिक बहुउद्देशीयग्रामीण सहकारी संस्थेअंतर्गत शिरूर तालुकाही येतो. समाजातील तळातील बलुतेदार, अलुतेदारांच्या उत्थानासाठी निर्मित संस्थेचा छगन मुळे यांनी ३० वर्षे कारभार केला. काही वर्षापासून अध्यात्मात रमल्याने त्यांनी संस्था विश्वासू आणि समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या दिगंबर नाईकनवरे यांच्या ताब्यात दिली. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडणुकीत नवनाथ भालेकर, दगडू शिरोळे, हरिभाऊ मस्के, दिनेश नारायणकर, महादेव आडागळे, ज्योती जोशी, रेखा नागथई यांची निवड झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis