डॉ. बी. आर. आंबेडकर फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार जाहीर
नांदेड, 13 एप्रिल (हिं.स.) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने मागील 24 वर्षांपासून डॉ. बी. आर. आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने पत्रकारिता तसेच सामाजिक, राजकीय, शिक्षण, सांस्कृतिक, साहित्य, सहकार आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखन
डॉ. बी. आर. आंबेडकर फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार जाहीर


नांदेड, 13 एप्रिल (हिं.स.) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने मागील 24 वर्षांपासून डॉ. बी. आर. आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने पत्रकारिता तसेच सामाजिक, राजकीय, शिक्षण, सांस्कृतिक, साहित्य, सहकार आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. यंदाच्या पुरस्कार प्राप्त मान्यवरांची घोषणा फाउंडेशनचे सचिव आकाश गजभारे यांनी केली आहे.

यावर्षी 2025-26 साठीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप 25 हजार रुपये रोख आणि मानपत्र असे आहे.

पत्रकारिता क्षेत्रातील कृष्णाई पत्रकारिता पुरस्कार इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रातील एबीपी माझाचे पत्रकार मिक्की घई यांना राज्यस्तरीय पुरस्कार म्हणून घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूपही 25 हजार रुपये रोख आणि मानपत्र असे आहे.

जिल्हास्तरीय पुरस्कारांमध्ये पत्रकार मुक्तेश्वर पाटील, दैनिक पुण्यनगरीचे भोकर येथील तालुका प्रतिनिधी डॉ. मनोज गिमेकर आणि छायाचित्रकार विजय होकर्णे यांचा समावेश आहे. या सर्वांना प्रत्येकी 10 हजार रुपये रोख आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

तसेच स्मृतिशेष मनोज गजभारे यांच्या स्मरणार्थ यंदाचा प्रज्ञावंत विद्यार्थी पुरस्कार यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी अतुल अनिल राजूरकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

या पुरस्कारांची घोषणा अध्यक्ष बापुराव गजभारे आणि उपाध्यक्ष सतीश बनसोडे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.-------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande