
बीड, 13 एप्रिल (हिं.स.)।
उन्हाळा यंदा अधिकच
तापायला लागला आहे. सध्या शहरात कमाल तापमानात गतवर्षेपेक्षा अधिक वाढ दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तीन ते चार सेल्सिअस तापमान अधिक असल्याचे फेब्रुवारी च्या मध्यापासूनच जाणवायला लागले आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यातच अंगाची लाही लाही करणारे ऊन जाणवत आहे. हवामान खात्याने सुद्धा यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक असल्याचे संकेत काही दिवसापूर्वीच दिले आहेत. दुपारी एक दीड वाजताच रस्ते निर्मनुष्य होतानाचे चित्र दिसत आहे.
अवकाळी पावसाच्या दोन-चार दिवसातील सरीमुळे वातावरणात किंचितसा गारवा निर्माण झाला होता त्यामुळे त्या दिवसात तापदायक उन्ह जाणवलच नाही. मात्र मे महिन्यात एप्रिलमध्येच दहा तारखेपासून उन्हाची दाहकता वाढत असल्याचे दिसून येत आहे. दिवसा कमाल तापमान ३५ आणि अधिक डिग्री पर्यंत गेल्याचे दिसून येत असून रात्रीचे तापमान अद्यापही १६ ते १८ सेल्सिअस दरम्यान आहे. त्यामुळे रात्री आणि पहाटे मोठ्या प्रमाणात थंडी जाणवत असून सकाळी नऊ ते दहा च्या दरम्यानच उन्हाचा कडाका सुद्धा जाणवत आहे. उन्हाळा यंदा लवकरच सुरू होत असल्याचे दिसून येत आहे. पुढील काही दिवसात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावर्षी मार्च तेवढा दाहक जाणवला नाही मात्र एप्रिल च्या १० तारखेपासून मे महिन्यात असल्या प्रमाणें उन्ह जाणवतं आहे. अचानकच जाणवायला लागलेल्या कडक उन्हामुळे बाजारात रांजण, माठ, सुरई विक्रेत्यांचा आगमन झालं असून त्यालाही मोठी मागणी आहे.
माटातील थंड पाण्याने तृष्णा शमवण्याचा हा एक कमी खर्चाचा उपाय आहे. याबरोबरच खरबूज, टरबूज, सर्जेराव, या बरोबरच शहाळे नारळ आदि उन्हाळी फळही रस्त्यावर आता मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहेत.
वाढत्या तापमामुळे आणि फेब्रुवारीतच वाढलेल्या उन्हामुळे में आणि जून महिन्यात उन्हाची काय स्थिती असेल याचा अंदाज आत्ताच लोक वर्तुउ लागले आहेत. मे महिन्यात जाणवणारी उन्हाची तीव्रता आता फेब्रुवारी मध्येच जाणू लागले आहे. दुपारी ११ च्या नंतर रस्त्यावर निघणं सुद्धा दुरापस्त होत असून रस्ते निर्मनुष्य होत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis