पुण्यात महाराजस्व समाधान शिबिरात साडेतीन हजाराहून अधिक लाभार्थ्यांना मिळाला लाभ
पुणे, 13 एप्रिल (हिं.स.)। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत लोणीकंद येथे पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात एकूण ३ हजार ८८५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आली असल्याची माहिती लोणी काळभोरच्या अपर तहसीलदार तृप्ती
Jsns


पुणे, 13 एप्रिल (हिं.स.)।

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत लोणीकंद येथे पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात एकूण ३ हजार ८८५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आली असल्याची माहिती लोणी काळभोरच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी दिली.

यामध्ये महसूल विभागाच्यावतीने २ हजार १५०, पंचायत समितीअंतर्गत ६३७, पशुसंवर्धन विभाग ४०, आरोग्य विभाग १३४, कृषी विभाग ३८२, महावितरण १८२, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ ३, भूमी अभिलेख २ आणि पुरवठा विभागाअंतर्गत ३६० याप्रमाणे एकूण ३ हजार ८८५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामध्ये नागरिकांच्या महसूल विषयक विविध समस्यांचे तात्काळ निराकरण करून, ७/१२ उतारे, फेरफार, ७/१२ दुरुस्ती, विविध दाखले तसेच विविध विभागाच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात, या शिबारात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होवून लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती कोलते-पाटील यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande