परतवाड्यात तरुणींच्या शोषणाचे गंभीर आरोप, संशयित युवक फरार, तक्रार अद्याप नाही
अमरावती, 13 एप्रिल (हिं.स.) परतवाडा येथे एका युवकाविरुद्ध अनेक तरुणींचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप समोर आले असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. भाजप प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, संबंधित युवकाने काही त
परतवाड्यात तरुणींच्या शोषणाचे गंभीर आरोप संशयित युवक फरार, तक्रार अद्याप नाही


अमरावती, 13 एप्रिल (हिं.स.) परतवाडा येथे एका युवकाविरुद्ध अनेक तरुणींचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप समोर आले असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. भाजप प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, संबंधित युवकाने काही तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते समाज माध्यमांवर व्हायरल केल्याचा आरोप आहे.या व्हिडिओंमध्ये संबंधित तरुणींची अनिच्छा दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, ब्लॅकमेलिंगचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित युवक कुटुंबीयांसह फरार झाल्याची माहिती समोर आली असून त्याच्या घराला कुलूप असल्याचे सांगितले जाते.दरम्यान, या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसून गुन्हा नोंद झालेला नाही. तरीही पोलिसांनी स्वतःहून दखल घेऊन तपास करून आरोपीला अटक करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande