शरद पवारांचा लवकरच पुणे जिल्हा ग्रामीण भागाचा दौरा
पुणे, 13 एप्रिल (हिं.स.)। माजी केन्द्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी भेट घेऊन जिल्ह्यातील पक्ष संघटना बांधणीबाबत चर्चा केली. पुणे येथे शरद पवार यांची देवदत्त निकम यांनी भेट घेतली.
Pawar Sahrad


पुणे, 13 एप्रिल (हिं.स.)। माजी केन्द्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी भेट घेऊन जिल्ह्यातील पक्ष संघटना बांधणीबाबत चर्चा केली. पुणे येथे शरद पवार यांची देवदत्त निकम यांनी भेट घेतली. त्यांच्या सोबत युवकचे जिल्हा उपाध्यक्ष केतन वाघ, शंकरराव टेमगिरे, विशाल भोर, सुमित मोरडे आदी उपस्थित होते. यावेळी श्री. पवार यांनी पक्ष संघटना वाढीसाठी नव्या जोमाने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या तसेच शरद पवार लवकरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा दौरा करणार असून पुन्हा नव्याने पक्षाची संघटना बांधणार असल्याचे निकम यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande