
सोलापूर, 13 एप्रिल (हिं.स.)जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उत्तर सोलापूर भूमी अभिलेख कार्यालयाचा वीज कनेक्शन केवळ १२ हजार रुपयांच्या थकबाकीमुळे आठ दिवसांपूर्वी तोडण्यात आला असून, त्यामुळे नागरिकांची कामे मोठ्या प्रमाणात रखडली आहेत.
वीज नसल्यामुळे पहिल्या मजल्यावरील कर्मचारी ऐन उन्हाळ्यात घामेघूम होत काम करत आहेत. संगणकीय कामकाजावरही परिणाम झाला असून, काही कागदपत्रांचे प्रिंट बाहेरून काढावे लागत असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, उत्तर सोलापूर कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात दक्षिण सोलापूर म्हणजेच खालच्या मजल्यावरील कार्यालयातून वीज जोडून काही प्रमाणात कामकाज सुरू ठेवण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड