सोलापुरात महात्मा बसवेश्वर पुतळ्याचे पुनःस्थापन व अनावरण
सोलापूर, 13 एप्रिल (हिं.स.) : कोतम चौक येथे महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची दुरुस्ती करून आज पुन्हा प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळी झालेल्या भव्य कार्यक्रमात या पुतळ्याचे अनावरण आणि विधीवत पूजन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे अनावरण म
Bdbd


सोलापूर, 13 एप्रिल (हिं.स.) : कोतम चौक येथे महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची दुरुस्ती करून आज पुन्हा प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळी झालेल्या भव्य कार्यक्रमात या पुतळ्याचे अनावरण आणि विधीवत पूजन मोठ्या उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाचे अनावरण महापौर श्री. विनायक कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पुतळ्याचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती सौ. रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त श्री. संदीप कारंजे, माजी नगरसेवक श्री. जगदीश पाटील, नगरसेवक श्री. अक्षय आजीखाने, आनंद मुस्तरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

कोतम चौक परिसरात महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यासह संपूर्ण परिसराचे सुशोभीकरणाचे काम सुरू असून, नागरिकांच्या सोयी लक्षात घेऊन हे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाणार आहे. यामुळे परिसराचे सौंदर्य अधिक वाढणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

दरम्यान, महापौर विनायक कोंड्याल यांनी महात्मा बसवेश्वर परिसर सुशोभीकरणासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

पुतळ्याची पुनःस्थापना झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande