
सोलापूर, 13 एप्रिल (हिं.स.)सोलापूर महानगरपालिकाच्या परिवहन समिती सदस्यांची निवड पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. यामुळे शहरातील परिवहन व्यवस्थेशी संबंधित निर्णय प्रक्रियेला विलंब होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, येत्या 20 एप्रिल रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत एकूण 7 विषय समित्यांच्या सदस्यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या निवडीमध्ये परिवहन समितीसह इतर महत्त्वाच्या समित्यांवरही लक्ष लागले आहे.
समिती सदस्य निवड प्रक्रियेत सतत होत असलेल्या विलंबामुळे प्रशासनिक कामकाजावर परिणाम होत असून, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा आणि निर्णयांना देखील उशीर होत आहे. त्यामुळे आगामी सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड