“संघटन सृजन अभियाना”तून गंगापूर तालुक्यात काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा निर्धार
छत्रपती संभाजीनगर, 13 एप्रिल (हिं.स.) : काँग्रेसची खरी ताकद तिच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि “संघटन सृजन अभियाना”च्या माध्यमातून गंगापूर तालुक्यात पक्षाला नव्या उंचीवर नेऊ, असे प्रतिपादन काँग्रेसचे एआयसीसी प्रभारी विवेक बन्सल यांनी केले.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार महाराष्ट्रभर “संघटन सृजन अभियान” राबवले जात असून, या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस कार्यालयात गंगापूर तालुक्यातील पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी राजकीय रणनीती ठरवण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीस काँग्रेसचे एआयसीसी प्रभारी विवेक बन्सल, राज्य मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, म.प्र. काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस धनंजय चौधरी, तसेच जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत प्रत्येक गावात काँग्रेसची विचारधारा पोहोचवणे, बूथ कमिट्या अधिक सक्रिय करणे, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणे आणि तालुक्यातील सर्व सेल व आघाड्यांमध्ये समन्वय वाढवणे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस तालुकाध्यक्ष सूर्यकांत गरड, आप्पासाहेब गावंडे, मोहसीन चाऊस, विजय मनाळ, नईम मन्सुरी, लक्ष्मण भुसारे, ज्ञानेश्वर वाघचौरे, ज्योती पंडीत यांच्यासह तालुका व जिल्हा स्तरावरील पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis

 rajesh pande