नांदेडमधील ‘मथुरा-लभान’ गोवंश संवर्धनाला राष्ट्रीय मान्यता; तज्ज्ञांचा गौरव
नांदेड, 13 एप्रिल (हिं.स.) : नांदेड जिल्ह्यातील ‘मथुरा-लभान’ गोवंशाच्या संवर्धन व संशोधन कार्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत असून या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तज्ज्ञांचा गौरव करण्यात आला. NBAGR मार्फत आयोजित SOCDAB-2026 परिषदेत जिल्हा
अ


नांदेड, 13 एप्रिल (हिं.स.) : नांदेड जिल्ह्यातील ‘मथुरा-लभान’ गोवंशाच्या संवर्धन व संशोधन कार्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत असून या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तज्ज्ञांचा गौरव करण्यात आला. NBAGR मार्फत आयोजित SOCDAB-2026 परिषदेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत परभणी येथील पशुवैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालयातील पशु अनुवंश व पैदास विभागाचे प्राध्यापक डॉ. पंडित नांदेडकर यांना ICAR-राष्ट्रीय प्राणी आनुवंशिक संसाधन ब्युरो, करनाल येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेत ‘मथुरा-लभान गोवंश - महाराष्ट्राचा अभिमान’ या विषयावरील सादरीकरणासाठी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

या यशानिमित्त जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी डॉ. नांदेडकर यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच मथुरा-लभान पशुपालक बालसिंग नानगू खचकड (रा. नागसवाडी, ता. किनवट) यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देण्यात आली. किनवट तालुक्यातील गोवंश संवर्धन प्रकल्पाचा आढावा सादर करत या जातीच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यात आली.

मथुरा-लभान गोवंशाच्या संशोधन व संवर्धन कार्याला मिळालेल्या या यशामुळे जिल्ह्यात समाधान व्यक्त केले जात आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande