
बीड, 13 एप्रिल (हिं.स.)।
बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानात आणखी वाढ झाली आहे. तापमानाचा पारा ४० पर्यंत पोहचल्याने अंगाची लाही लाही होत आहे. दरम्यान आठवडाभर वातावरण अतिशय उष्णतेचे राहणार असल्याने आवश्यक ती काळजी व दक्षता घेण्याची गरज आहे.
मुबलक व मोकळा सूर्यप्रकाश परंतु तापमानाचा पारा ४० अंशापर्यंत पोहचलेला होती. याची तीव्रता ४२ अंश तापमानासारखी जाणवत होती. बचावासाठी वापरले जाणारे पांढरे कपडेही गरम झाले होते. काही वेळ उन्हात फिरले अथवा थांबले तर चटके बसत होते.
दरम्यान पुढील आठवडाभर अतिउष्णतेचे असल्याने आवश्यक उपाय करून वाढत्या उन्हापासून संरक्षण करणे गरजेचे आहे.
तहान नसली तरी भरपूर पाणी, सरबत प्यावे, हवा खेळती राहण्यासाठी पख्यांचा वापर करावा. सैल व सौम्य रंगाचे सुती कपडे वापरावेत. शारीरिक कष्टाची कामे टाळावीत. सावलीत थांबणे, हळुवार चालावे, टोपी, फेटा, चष्मा वापरणे, उन्हातून आल्यानंतर चेहऱ्यावर ओला कपडा ठेवावा. दुपारी १२:०० ते ४:०० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis