लातूर, 13 एप्रिल (हिं.स.) - सद्यस्थितीत इराण अमेरिका - इस्रायलच्या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर उमटत आहेत. युद्ध या विषयाकडे आपण भावनिकतेने पाहतो. मुळात युद्ध हा एक बाजारपेठीय परिस्थितीचा भाग आहे. आर्थिकदृष्ट्या अमेरिकेला परवडेनासे झाल्यामुळे हे युद्ध थांबल्याचे मत लेखक तथा संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंदतीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने कस्तूर कांचन सभागृहात आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यावरणतज्ज्ञ ज्येष्ठ पत्रकार अतुल देऊळगावकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
तेल ही संकल्पना १९३० च्या सुमारास उदयास आली. तेलाच्या मालकीमुळे महासत्ता इंग्लंडकडून अमेरिकेकडे गेली. तेल हा विषय आजच्या काळातील वादाचा नसून तो साधारणतः १५० - २०० वर्षांपासूनचा वादाचा विषय आहे. जवळपास ३५० उत्पादने तेलाशी संबंधित आहेत. उर्जेवरची मालकी महत्वाची असते. त्यासाठीच अमेरिकेने इराणशी युद्ध छेडल्याचे ते म्हणाले आपल्या देशात ऊर्जाविषयक धोरण देशाच्या नव्हे तर उद्योगपतीना धार्जिणे असल्याचे दिसून येते. जगात ज्या ज्या देशांनी ऊर्जेविषयक धोरणाला महत्व दिले ते ते देश मोठे झाले. अभियांत्रिकी क्षेत्रात चीन खूप पुढे आहे. प्रगतीतही चीन आपल्या तुलनेत आघाडीवर आहे. हे न पाहता आपण चीनला किरकोळ पेतो हे चुकीचे आहे. चीन सरकारने आपले स्वतःचे उत्पन्न अमेरिकेत गुंतवल्याने अमेरिका चीनशी पंगा घेण्याच्या फंदात पडत नाही. कोणत्या गोष्टीचा वापर, अवलंब किती करावा हेही महत्वाचे असते. फेसबुकने आजमितीस सगळ्या जगाला वेड लावले आहे पण फेसबुकच्या निर्मात्याच्या घरातच फेसबुक पाहिले जात नाही. टिकटोंक चीनने विकसित केले, पण चीनमध्ये त्यावर बंदी असल्याचे सांगून कुबेर यांनी या बाबीकडे भारतीयांनीही गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे असे सांगितले. जगात सर्वात भ्रष्ट क्षेत्र मिलिट्री आणि फार्मास्युटिकल कक्षेत्र असल्याचेही त्यांनी नमूद केले. आपल्याकडे आर्थिक विचारच शांगितलं जात नाही. स्पर्धेत टिकण्यासाठी काय करायला हवे?, याचे आकलनच राज्यकत्यांना नसल्याचे त्यांनी नमूद केले.
दाखवल्या आणि खेळवल्या जाणाच्या युद्धामागील सूत्रधार कोण असतात? बॉम्ब आणि क्षेपणास्त्रे न वापरता केवळ जीवजंतू पाठवून युद्ध तयारी कशी होते? युद्धातून नफेखोरी कशी होते? अचाट आघाडी घेणाऱ्या चीनच्या विकासाचे स्वरूप नेमके कसे आहे?, अशा अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis