सोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीत 15 एप्रिल पासून पाणी सोडणार
सोलापूर, 13 एप्रिल (हिं.स.)। उजनी धरणातून खाली भीमा नदीत 15 एप्रिल पासून पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी खाली हिळ्ळी व खानापूर टेल एण्डपर्यंत सोडण्याची मागणी आता या भागातील शेतकरी करताना दिसून येत आहेत. अक्कलकोट तालुक्यात सध्या दिवसेंदिवस तापमाना
ujani dam news


सोलापूर, 13 एप्रिल (हिं.स.)। उजनी धरणातून खाली भीमा नदीत 15 एप्रिल पासून पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी खाली हिळ्ळी व खानापूर टेल एण्डपर्यंत सोडण्याची मागणी आता या भागातील शेतकरी करताना दिसून येत आहेत. अक्कलकोट तालुक्यात सध्या दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. तसेच शेतीसाठी बंधाऱ्यातील पाण्याची उपसा अधिक होत असल्याने सध्या हिळ्ळी व खानापूर बंधाऱ्यातील पाण्याची पातळी घटली गेली आहे.

आता दहा ते बारा दिवसच पुरेल इतका पाणीसाठा बंधाऱ्यात शिल्लक राहिल्याने हिळ्ळी व खानापूर परिसरातील शेतकरी चिंतातूर झाले आहेत. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने बाष्पीभवन होऊन दिवसेंदिवस बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. हिळ्ळी बंधाऱ्याच्या खाली महाराष्ट्र सरकारची तीन किलोमीटर पर्यंत हद्द आहे. सध्या या भागात पाणीच शिल्लक नसल्याने जनावरांचे व वाडी वस्तीवरील जनतेचे हाल होत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande