शेंदुरवादा येथील अवैध कत्तलखान्यावर वाळूज पोलिसांची कारवाई
छत्रपती संभाजीनगर, 13 एप्रिल (हिं.स.)। गंगापूर तालुक्यातीलशेंदुरवादा परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या गोवंश कत्तलखान्यावर वाळूज । १४ पोलिसांनी छापा मारला. यावेळी १४ जनावरांची सुटका करण्यात आली तर, १ लाख ५ हजार रुपये किमतीचे अडीच क्विंटल मांस जप्त
शेंदुरवादा येथील अवैध कत्तलखान्यावर वाळूज पोलिसांची कारवाई


छत्रपती संभाजीनगर, 13 एप्रिल (हिं.स.)। गंगापूर तालुक्यातीलशेंदुरवादा परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या गोवंश कत्तलखान्यावर वाळूज । १४ पोलिसांनी छापा मारला. यावेळी १४ जनावरांची सुटका करण्यात आली तर, १ लाख ५ हजार रुपये किमतीचे अडीच क्विंटल मांस जप्त करण्यात आले आहे.

शेंदूरवादा गावात गोवंश कत्तलखाना मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची हत्या केली जात असल्याची माहिती पोलीस निरिक्षक शिवचरण पांढरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने छापा मारला. त्यावेळी ६०किलो गोमांस तर अन्य एका रुममध्ये २ क्विंटल मांस दिसून आले. तर बाजुला बांधलेल्या १४ जणावरांची सुटका करण्यात वाळूज पोलीस ठाण्यात दोन फरार अशा सहा आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई निरिक्षक शिवंचरण पाढरे यांच्या मागदर्शनाखाली पोअं नितीन धुळे, सुधाकर पाटील, गजानन सपकाळ, विजय पिंपळे, मोअ त्रिभुवन गुन्हे शाखेचे पोह तायडे डोईफोडे यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande