
रत्नागिरी, 13 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरीत 15 ते 30 एप्रिल कालावधीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे.
या कृती पंधरवड्याचा प्रारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या प्रमुख उपस्थितीत 15 एप्रिल रोजी व समारोप 30 एप्रिल रोजी होणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता विवेक सोनार यांनी दिली.
या कृती पंधरवड्यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 15 एप्रिल रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2026 साजरा करणे व जलसंपदा पंधरवडा शुभारंभ, 16 एप्रिल रोजी जलसंपदा अधिकारी/कर्मचारी प्रशिक्षण, १७ एप्रिल रोजी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, जल पुनर्भरण, १८ एप्रिल रोजी शेतकरी पाणी वापर संस्था संवाद, १९ एप्रिल रोजी जागतिक महिला शेतकरी वर्ष विचारात घेऊन कार्यकमाचे नियोजन करण्यात यावे, २० एप्रिल रोजी भूसंपादन व पुनर्वसन इत्यादी अडचणींचे निराकरण, कालवा संयुक्त पाहणी, २१ एप्रिल रोजी धरण/कालवा स्वच्छता अभियान, नदी प्रदूषण नियंत्रण, पाणंद रस्ता दुरुस्ती, २२ एप्रिल रोजी उपसा सिंचनाचे पाणी परवानगी देण्यासाठी तक्रारींचे निरसन करणे, २३ एप्रिल रोजी जलसंपदा व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पीक पद्धतीबदल, उत्पादकता वाढ, पाण्याचे नियोजन इत्यादी बाबत बैठक, प्रदर्शने, कार्यशाळा मार्गदर्शन कार्यक्रम, २४ एप्रिल रोजी सिंचन- ई-प्रणाली, पाणी दर, पाणपट्टी आकारणी व वसुली याबद्दल तक्रारी निवारण, २५ एप्रिल रोजी विद्यापीठ, केव्हीके, सेवाभावी संस्था यांच्या समवेत संवाद व कृती कार्यक्रम, २६ एप्रिल रोजी नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या प्रत्यक्ष पाणी वापराचा जललेखा परीक्षण, २७ एप्रिल रोजी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन (पूर / मालमत्तेचे रक्षण), २८ एप्रिल रोजी महसूल विभागाच्या समन्वयाद्वारे जमिनीचा ७/१२ उतारा कमी/जास्त करणे /अतिक्रमण हटविणे. २९ एप्रिल रोजी पाणी वापर संस्था सक्षमीकरण चर्चासत्र / कार्यशाळा, ३० एप्रिल पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा मुख्यालयी कार्यशाळा / महिला मेळावा, पंधरवड्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या अभियंत्यांचा सत्कार व पंधरवडा समारोप होणार आहे.
२५ एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म त्रिशताब्दी वर्ष साजरे करण्यात येत असल्याने जलसंपदा विभागामार्फत गोदावरी नर्मदा जल दिंडीचे आयोजन करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी