मांजरा धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडले; पाच तालुक्यांतील १८ हजार हेक्टर क्षेत्राला दिलासा!
बीड, 13 एप्रिल (हिं.स.)। मांजरा धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांतून उन्हाळी पिकांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कालवा सल्लागार समितीने घेतला आहे. हे पाणी पुढील पंधरा दिवस सोडले जाणार असून याचा थेट लाभ केज, अंबाजोगाई, रेणापू
अ


बीड, 13 एप्रिल (हिं.स.)।

मांजरा धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांतून उन्हाळी पिकांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कालवा सल्लागार समितीने घेतला आहे. हे पाणी पुढील पंधरा दिवस सोडले जाणार असून याचा थेट लाभ केज, अंबाजोगाई, रेणापूर, लातूर आणि कळंब या पाच तालुक्यांतील १८ हजार हेक्टर क्षेत्राला मिळणार आहे. मांजरा धरणात सध्या ५९.८१ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्याने ऊस आणि भाजीपाला पिकांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणाऱ्या भागात पिकांना जीवदान मिळणार असून परिसरातील ६३ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निकाली निघाला आहे. ऊस उत्पादक पट्ट्यात या निर्णयाचे स्वागत होत असून बळीराजा सुखावला आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande