संघटन मजबूत झाले की निवडणूक जिंकणे सोपे – भास्करराव आंबेकर
परभणी, 13 एप्रिल (हिं.स.) - संघटन मजबूत झाले की निवडणूक जिंकणे सोपे जाते. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसैनिकांनी एकजुटीने कार्य करून पक्ष संघटन अधिक सक्षम करावे व पक्षाला यश मिळवून द्यावे, असे आवाहन जिल्हा संपर्कप्रमुख भास्करराव आंबेकर यांनी केले आहे
अ


परभणी, 13 एप्रिल (हिं.स.) - संघटन मजबूत झाले की निवडणूक जिंकणे सोपे जाते. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसैनिकांनी एकजुटीने कार्य करून पक्ष संघटन अधिक सक्षम करावे व पक्षाला यश मिळवून द्यावे, असे आवाहन जिल्हा संपर्कप्रमुख भास्करराव आंबेकर यांनी केले आहे.

परभणी येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा भव्य मेळावा जिल्हा संपर्कप्रमुख भास्करराव आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.

या कार्यक्रमास जालना संपर्कप्रमुख पंडितदादा भुतेकर, जिल्हाप्रमुख ए. जे. पाटील बोराडे, जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, सहसंपर्कप्रमुख भास्करराव लंगोटे, महानगरप्रमुख माणिक पोंढे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पानपट्टे, पप्पू पवार, प्रवीण देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

मेळाव्यास पदाधिकारी व शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. या मेळाव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात संघटन अधिक जोमाने उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande