पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद
पुणे, 13 एप्रिल (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारी (१६ एप्रिल) शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ही देखभाल दुरुस्तीची कामे करणे आवश्यक असल्याने गुरुवारी संपूर्ण पुण
water


पुणे, 13 एप्रिल (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारी (१६ एप्रिल) शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ही देखभाल दुरुस्तीची कामे करणे आवश्यक असल्याने गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. गुरुवारी या कामामुळे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (१७ एप्रिल) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. महापालिकेच्या पर्वती जलकेंद्र अखत्यारीतील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि होळकर पंपिंग येथे विद्युत विषयक देखभाल व दुरुस्तीची कामे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने केली जाणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शहराचाच पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी ही माहिती दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande