लातूर : ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक जाहीर; १० सरपंच पदांसाठी ३९ नामनिर्देशनपत्र दाखल
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नागरिकांमध्ये निरुत्साह लातूर, 14 एप्रिल (हिं.स.)। लातूर जिल्हयातील ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य अनेक कारणामुळे अपात्र ठरले होते. तर कांही सदस्य मयत झाले, तर कांही ठिकाणी एकही नामनिर्देशनपत्र न आल्यामुळे ग्रामपंचायतीच्या ज
सरपंच


ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नागरिकांमध्ये निरुत्साह

लातूर, 14 एप्रिल (हिं.स.)। लातूर जिल्हयातील ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य अनेक कारणामुळे अपात्र ठरले होते. तर कांही सदस्य मयत झाले, तर कांही ठिकाणी एकही नामनिर्देशनपत्र न आल्यामुळे ग्रामपंचायतीच्या जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यासाठी पोटनिवडणूक जाहिर झाली आहे. या पोट निवडणूकीत जिल्हयातील ६० ग्रामपंचायतीमधील १० सरपंच थेट निवडले जाणार आहेत. तसेच ५८ ग्रामपंचायत सदस्यही निवडले जाणार आहेत. त्यासाठी १३ एप्रिल हा दिवस नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी १० सरपंच पदासाठी ३९ नामनिर्देशनपत्र, तर ५८ ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ३७ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. असे असले तरी या ग्रामपंचायत निवडणूकीसाठी नागरीकांमध्ये निरूत्साह दिसून येत आहे.

२८ एप्रिल रोजी मतदान

लातूर जिल्हयातील अहमदपूर, जळकोट, लातूर, औसा व निलंगा तालुक्यातील १० ग्रांपपंचायतीच्या सरपंचांची थेट जनतेतून निवड करण्यासाठी व ५८ ग्रामपंचायत सदस्य पदासाठी दि. मंगळवार दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत नागरीक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर दि. २९ एप्रिल रोजी मतमोजणी त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे.

लातूर जिल्हयातील कांही ग्रामपंचायतींचे सरपंच अपात्र ठरले, कांही सरपंच मयत झाले.

जळकोट तालुक्यातील सरपंच पद रिक्त राहणार

ग्रामपंचायत निवडणूकीत जळकोट तालुक्यातील येवरी गावातून नामाप्र या प्रवर्गातून थेट सरपंच निवडीसाठी पोट निवडणूक लागली आहे. मात्र शेवटच्या दिवसा पर्यंत एकही नामनिर्देशनप नामनिर्देशनपत्र दाखल न झाल्याने सदर जागा ही रिक्त राहणार आहे. तसेच अहमदपूर तालुक्यातील मावलगाव नामाप्र व किनगाव अनुसुचित जाती स्त्री या सरपंच पदासाठी ८ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. लातूर तालुक्यातील बोपला अ. जाती स्त्री, भुईसमुद्रगा नामाप्र व गंगापूर अ. जाती स्त्री या सरपंच पदासाठी १२ नामनिर्देशनपत्र, औसा तालुक्यातील गांजनखेडा अ. जमाती, किनीनवरे अ. जाती, गोंद्री नामाप्र या सरपंच पदासाठी १५ नामनिर्देशनपत्र, तर निलंगा तालुक्यातील बोरसुरी अ. जाती स्त्री प्रवर्गासाठी ४ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत.

ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निरुत्साह

जिल्ह्यातील ५८ ग्रामपंचायत सदस्यपदासाठी पोट निवडणूक लागली आहे. या पोट निवडणूकीत सदस्यपदाच्या निवडीसाठी निरुत्साह दिसून येत आहे. ५८ ग्रामपंचायत सदस्यपदासाठी केवळ ३७ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. यात अहमदपूर तालुक्यातील ७ सदस्यपदासाठी ५ नामनिर्देशनपत्र, जळकोट तालुक्यातील १ सदस्यपदासाठी १ नामनिर्देशनपत्र, उदगीर ४ सदस्यपदासाठी ७ नामनिर्देशनपत्र, देवणी ४ सदस्यपदासाठी १ नामनिर्देशनपत्र, शिरूर अनंतपाळ ५ सदस्यपदासाठी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही. चाकूर ६ सदस्यपदासाठी १ नामनिर्देशनपत्र, रेणापूर ४ सदस्यपदासाठी २ नामनिर्देशनपत्र, लातूर ६ सदस्यपदासाठी ६ नामनिर्देशनपत्र, औसा १० सदस्यपदासाठी १० नामनिर्देशनपत्र, निलंगा ११ सदस्यपदासाठी ४ नामनिर्देशनपत्र दाखल झाले.

कांही ठिकाणी नामनिर्देशनपत्र आले नाही. काही ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा दिल्याने सदस्य पदाच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक पार पडत आहे. मात्र या पोट निवडणूकीत नागरीकांचा फारसा उत्साह दिसून येत नाही. या पोट निवडणूकीत रिक्त १० सरपंच पदासाठी व ५८ ग्रामपंचायत सदस्य पदासाठी दि. ७ ते १३ एप्रिल या कालावधी पर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करायचे होते. दि. १३ एप्रिल या शेवटच्या दिवसा पर्यंत १० सरपंच पदासाठी ३९ नामनिर्देशनपत्र, तर ५८ ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ३७नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. या नामनिर्देशनपत्रांची छाननी बुधवार दि. १५ एप्रिल रोजी होणार आहे. दि. १७ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्र दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप व अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande