
लातूर, 14 एप्रिल, (हिं.स.) | पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशांवर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात लातूर जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर प्रभावी आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा कारवाई करत आयपीएल क्रिकेट सट्टा चालविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील अंबेजोगाई रोड परिसरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा नावाचा जुगार खेळत असून लोकांकडून फोनद्वारे पैशांची देवाणघेवाण करणाऱ्या वर पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तत्काळ सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. छाप्यात एका चारचाकी वाहनामध्ये बसून सट्टा चालविणाऱ्या चार आरोपींना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे.
१)सचीन प्रकाश वलसे
वय : ४७ वर्षे रा. मयूरवन, अंबेजोगाई रोड, लातूर.
२)किरणकुमार अर्जुन केंद्रे
वय : ४१वर्षे, रा. कृपा सदन रोड, गणेश मेडिकल जवळ, लातूर.
३)गंगाधर रामराव घाडगे
वय : 51 वर्षे रा. होळी, ता. लोदगा, जि. लातूर.
४)मनीष श्रीकांत पंचाक्षरी
वय : ३७ वर्षे, रा. खडक हनुमान, दयाराम रोड, लातूर.
असे असून प्राथमिक चौकशीत आरोपी हे आयपीएल सामन्यांवर सट्टा घेऊन लोकांकडून पैसे गोळा करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर कारवाईदरम्यान आरोपींकडून क्रिकेट सट्टा खेळण्यासाठी वापरण्यात येणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले असून त्यामध्ये—
विविध कंपन्यांचे मोबाईल फोन,एक लॅपटॉप, रोख रक्कम, सट्टा व्यवहाराच्या नोंदी, क्रेटा चारचाकी वाहन (क्र. MH 26 BT 9909) असा एकूण अंदाजे १३,७३,०९०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपी हे आयपीएल क्रिकेट सामन्यांवर “सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स” या सामन्यावर सट्टा घेत असल्याचे उघड झाले आहे. ते मोबाईल फोन व ऑनलाइन माध्यमांचा वापर करून ग्राहकांशी संपर्क ठेवत सट्टा व्यवहार करत होते.
सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोउपनि राजेश घाडगे, पोलीस अमलदार युवराज गिरी, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, सिद्धेश्वर मदने,जमीर शेख यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis