परळीच्या शेतकऱ्याचा उसात 'शुगर फ्री' गव्हाचा यशस्वी प्रयोग; अडीच लाखांचे अतिरिक्त उत्पन्न!
बीड, 14 एप्रिल (हिं.स.)।परळी तालुक्यातील पिंपळगाव येथील प्रयोगशील शेतकरी लक्ष्मण राडकर आणि त्यांचे सुपुत्र गोवर्धन यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत उसात आंतरपीक म्हणून ''शुगर फ्री'' गव्हाची यशस्वी लागवड केली आहे. बुलडाणा येथील कृषी विज्ञान केंद्रा
अ


बीड, 14 एप्रिल (हिं.स.)।परळी तालुक्यातील पिंपळगाव येथील प्रयोगशील शेतकरी लक्ष्मण राडकर आणि त्यांचे सुपुत्र गोवर्धन यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत उसात आंतरपीक म्हणून 'शुगर फ्री' गव्हाची यशस्वी लागवड केली आहे. बुलडाणा येथील कृषी विज्ञान केंद्रात विशेष प्रशिक्षण घेऊन त्यांनी पाच फूट अंतरावरील उसाच्या मोकळ्या जागेत टोकन यंत्राच्या साहाय्याने हा प्रयोग राबवला. या नियोजनातून त्यांना २० क्विंटल शुगर फ्री गहू आणि १० क्विंटल मका असे विक्रमी उत्पादन मिळाले असून, त्यातून साधारण अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मुख्य पीक असलेल्या उसाला धक्का न लावता घेतलेले हे आंतरपीक वाढत्या मधुमेहाच्या काळात आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने बाजारात त्याला मोठी मागणी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande