
नाशिक, 14 एप्रिल (हिं.स.)। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतीय जनता पार्टी कार्यालय,वसंतस्मृती येथे करण्यात आली.प्रारंभी भाजपा महानगर जिल्हा अध्यक्ष सुनिल केदार, अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष राकेश दोंदे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन बुध्द वंदना करण्यात आली.
यावेळी आपल्या भाषणात सुनील केदार यांनी बाबासाहेबांच्या महान कार्याचा गौरव केला.डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच आज देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार मिळाला आहे.त्यांचे विचार आणि कार्य पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतील असे गौरवउद्गार त्यांनी यावेळी काढले.
कार्यक्रमाप्रसंगी प्रदीप पेशकार, गिरीश पालवे,काशिनाथ शिलेदार,शैलेश जुन्नरे,गणेश कांबळे,प्रा. कुणाल वाघ, नगरसेवक भगवान दोंदे, प्रियंका दोंदे, कुंदन खरे, यशवंत नेरकर, सुनिल पनीकर, बबन ढगे,ॲड. पवन गुरव,राजेंद्र जडे,व्यंकटेश मोरे,प्रदिप पाटील,अरूण येडे, लक्ष्मण पगारे,राजू मोरे,धिरेंद्र नेवारे, अनिल मोरे,मदन निकम,सुजाता करंजीकर,संगीता जाधव,अनिता भामरे,ज्योती कंवर,ललिता बिरारी, संदीप दोंदे,डॉ.चंद्रशेखर नागपूरकर, दिनेश जाधव,महेश भामरे,विजय देवगांवकर,अक्षय गांगुर्डे,आदित्य सोनवणे,मिहिर हजारे,अभिनय यादव यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे आणि अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV